ह्या प्रेमाचा रंग कसा
प्रश्न पड़े मज
प्रथम ऐकला जव स्वर तुझा
वाटले हीच असे मम कन्या राणी ॥ १ ॥
न स्मरे मज
कधी भेटलो मी तुज
कधी गाईली अंगाई
कधी चाललिस तू
बोट धरून माझे
कधी ऐकले बोबडे बोल तुझे
नाठवे मजला
ह्या प्रेमाचा रंग कसा -- -- ॥ २ ॥
करुणासागर असे तव हृदयी
कोकिल स्वरा नृत्यांगना
स्वयं सिद्धा असशी तू
बघुनी हे सुंदर रूप तुझे
वाटे करावी कवतिके
ह्या प्रेमाचा रंग कसा -- -- ॥ ३ ॥
कालाचा आरसा रुपे अनंत दावी
गत जन्मी मम कन्या तू असावी
इश कृपे जरी विस्मारालो ते सर्व काही
परी नाते स्वरांचे आठवे पूर्व सुकृते आजही ॥ ४ ॥
ह्या प्रेमाचा रंग कसा
उलगडे हा प्रश्न मला
विश्वास असे गतजन्मिची
मम कन्या राणी
भेटली मज ह्या जन्मी
हृदयी वसे ती उर्मी ममतेची
ह्या प्रेमाचा रंग असा ॥ ५ ॥
जयंता काका
1 comment:
atishay sunder.hi kavitach tula kanya rupane bhetali ahe. jayashree
Post a Comment